Breaking News
recent

टुनकी येथील 19 वर्षीय तरुणाचा हृदय बंद पडून अकाली मृत्यू

 


टुनकी ता संग्रामपूर येथे पहाटे रनिंग करून परतलेल्या एका 19 वर्ष तरुणाचा हदय बंद पडून अकाली मृत्यू  झाल्याची दुर्दैवी घटना घडली मंगळवार 19 सप्टेंबरच्या सकाळी साडेसात वाजता ची घटना आहे अकाली मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव गणेश विष्णू लोणकर असे आहे. ऐन गणेश चतुर्थीला गणेश चा अकाली मृत्यू अनेकांच्या  मनाला झटका लावून गेला यामुळे गावावर शोककळा पसरली व गावकरी हळहळले मृतक गणेशवर दुपारी एक वाजता शेका कुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून मित्र  सोबत रनिंग करीत होता

 भारतीय सैन्यात भरतीसाठी बावनवीर रोडवर रोज सकाळी गणेश जीव तोड मेहनत घेत होता मात्र मंगळवारच्या पहाटे अकाली मृत्यू झाला रनिंग करून घरी परत आला त्यानंतर चहा घेऊन झाल्यावर तो अचानक पडला त्यांचे हदय बंद पडले हदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला यास उपचारासाठी दवाखान्यात देण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती या आधी गत तीन वर्षांपूर्वी गणेशचा मोठा भाऊ शॉक लागून मृत्यू पावला वडील शेती अन् ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करतात दोन्ही मुलांचे अकाली मृत्यूने विष्णू लोणकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

Powered by Blogger.