तालुकास्तर क्रीडा ही राष्ट्रीय स्पर्धेची पहिली पायरी
मलकापूर दि20). प्रत्येक शालेयस्तरावर खेळाडू घडत असतांना त्यास तालुकास्तर क्रीडा क्षेत्रात मिळणारी संधी ही त्यास राष्ट्रीय वेळप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कामगिरी बजावता येते. त्यामुळे तालुकास्तर क्रीडा स्पर्धा ही यशाची पहिली पायरी आहे असे मत जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव चंद्रकांत साळुंके यांनी मलकापूर येथील तालुका पातळीवरील क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी व्यासपिठावर प्रा. वराडे, संयोजक दिनेश राठोड, प्रा. डहाके हे उपस्थीत होते. आज संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील शालेय स्पर्धेत नुतन विद्यालय चमूने गतवर्षीच्या विजेता लि. भो चांडक विद्यालयाचा २४ धावांनी पराभव केला तर मुलींचे १९ वर्षाखालील सामन्यात लि. भो. चांडक विद्यालयाची चमू व १७ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात एम. एस. एम ईंग्लीश स्कूल संघ प्रतिस्पर्धी संघ हजर होवू न शकल्याने तालुका संयोजक दिनेश राठोड यांनी या दोन्ही संघांना विजयी घोषित केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक स्वप्नील साळुंके, पंच समीर शेख, विवेक भुयारकर, ओम गायकवाड, जय गाढे व नईमखान यांनी सहकार्य केले.