पावसाने दांडी मारल्याने संत्रा बागांची फळगळती
गत महिन्यापासून पावसाने दांडी मारल्याने संत्रा फळाची निम्म्यापेक्षा गळती झाल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, टुनकी, लाडणापूर, सगौडा, पिंगळी सायखेड, वारखेड, बोरखेड शिवारात मोठ्या प्रमाणात संत्र्याच्या बागा आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी मृग बार घेण्यासाठी संत्राबागांना मे महिन्यापर्यंत पाण्याचा ताण दिला होता.
जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी संत्रा झाडांना पाणी दिल्याने संत्रा झाडावर मृग बार दमदार दिसू लागला. परिणामी, गत महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने उष्णतामानात प्रचंड वाढ झाली. लोडशेडिंग तसेच शेतीपंपाचा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठ्यामुळे संत्रा झाडांना योग्य प्रकारे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे बोराच्या आकाराएवढ्या संत्राफळांची मोठ गळती झाली. या परिस्थितीमुळे लाख रुपये देणारा संत्रा शेतकऱ्यांना संकटा जाताना नजरेसमोर दिसत आहे.
पाच एकरात संत्रा पिकाला योग्य प्रकारे खत
कीटकनाशकाची फवारणी संत्रा गळती थांबवण्यासाठी केली. मात्र, सदोष वातावरणामुळे संत्रा गळती थांबली नाही.-रवी लव्हाडे, संत्रा उत्पादक शेतकरी सोनाळा