Breaking News
recent

सावळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शेक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरे.


                                सावळी येथील जाधव कुटूबाचे अभिनव उपक्रमांचे सर्वत्र कौतुक .  

मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड 

मानोरा तालुक्यातील सावळी येथील जाधव कुटूबातील श्री.संदीप गोविंद जाधव व सौ पायल संदीप जाधव या दाम्पत्यानी आपल्या मुलीचे वाढदिवस घरी साजरा न करता सावळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शेक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केले. 

       सविस्तर वृत असे की, सावली येथील श्री.संदीप गोविंद जाधव व सौ.पायल संदीप जाधव हे दाम्पत्य दारव्हा जि यवतमाळ येथे पोलिस खात्यात नौकरी निमित्त सध्या रहवाशी असून यांना दोन मुली आहेत त्या पैकी लहान मुलीचे कु.परी संदीप जाधव या मुलीचे ४ था व लहान भाऊ श्री. सौरभ गोविंद जाधव यांची मुलगी कु.श्रावनि सौरभ जाधव 7 वा या दोन्ही मुलीचे वाढदिवस आज दि.०१/०९/२०२३ या दिवशी होते. या दाम्पत्यानी आपल्या मुलीचे वाढदिवस घरी साजरा न करता सावळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शेक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला. या उपक्रमामुळे या दाम्पत्यानी वाढदिवस कार्यक्रमातून आदर्श निर्माण केले आहे यामुळे या दाम्पत्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या कार्यक्रमाला गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचयात सदस्य व जि.प. प्रा शाळेचे श्री.दिगंबर शेवाळे सर,श्री.माधव भंगेसर,श्री.विशाल चव्हाण सर,अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी,गावातील प्रतीस्थित नागरिक,पालकवर्ग,विद्याथी,बालगोपाल,उपस्थित होते. 


प्रतिक्रिया...

    आज माझ्या मुलीचे वाढदिवस होते हे वाढदिवस घरी साजरे करताना होणारे खर्च व्यर्थ न घालता गरजू विद्याथीचे शिक्षणाकरिता आपल्या परीने मदत होईल त्या पेक्षा पुण्य दूसरा कोणता मिळेल या उदेशाने हा उपक्रम राबविण्यात आला. 

                           श्री.संदीप गोविंद जाधव सावळी 


प्रतिक्रिया...

     मी पोलिस खात्यात नौकरी करीत असल्यामुळे मला मुली करिता पुरेशा वेळ मिळत नाही वेळेचे व शिक्षणाचे महत्व काय असते याची आम्हाला जाणीव असल्यामुळे माझ्या मुलीचे वाढदिवस या प्रकारे साजरे करण्यांचे या संकल्पनेतू आले.

            सौ.पायल संदीप जाधव (म.पोलिस दारव्हा)

Powered by Blogger.