Breaking News
recent

दुष्काळाने पोटात आणला गोळा, शेतकऱ्यांने कसा साजरा करावा पोळा..शेतकरी नेते मनोहर राठोड


 मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :--- 

जुलै महिन्यात धुवाधार बरसलेला पाऊस नंतर पाठ मुरडून गेला.तो परतलाच नाही.२२ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा थेंब नाही.उन्हाच्या तीव्रतेने पिकांची अवस्था दररोज बिकट होत आहे.सोयाबीन पिकांच्या शेंगा अखेरच्या घटका मोजत आहेत.तर कापसाच्या पिकाने माना टाकल्या आहेत.यामुळे पोळा सणावर चिंतेचे सावट पसरले आहे.दुष्काळाने पोटात आणला गोळा,शेतकऱ्यांने कसा साजरा करावा पोळा अशी विवेचना परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी व्यक्त केली आहे.कृषी अर्थव्यवस्थेत पोळा हा मोठा उत्सव असतो.दरवर्षी पोळ्याच्या सणाला ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करण्यात असतो.परंतु यावर्षी पावसाने पाठ फीरविल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे.यामुळेच यावर्षीच्या खरीप हंगामात पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले

आहे.जमिनीला भोंगा पडल्याने सोयाबीनच्या शेंगा भरणार किंवा नाही हे सांगणे अवघड झाले आहे.पऱ्हाटीच्या पात्या पाण्याअभावी गळत आहेत.एकूणच पिकांची अवस्था बिकट आहे.खरीपातील मुख्य पिकांची ही अवस्था वाढत्या उन्हामुळे अधिकच बिकट होत आहे.शेतकरी आभाळाकडे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.ओलीताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनाही भारनियमनामुळे ओलित करता येते नाही.निसर्गाच्या आस्मानी प्रकोपाबरोबर शासनाचे सुलतानी धोरणही शेतकऱ्यांचे जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार चालविला असल्याचे आरोपही मनोहर राठोड यांनी व्यक्त केली आहे 

         अशातच शेतकऱ्यांचा भावनिक व थकवा घालविणारा सण उत्सव म्हणजे फोळा वेगवेगळी स्वप्न रंगवून शेतकरी हा सण साजरा करीत असतो कधी मुलाबाळांसाठी चांगल्या शिक्षणाचे तर कधी घरांत उपवर मुलींसाठी चांगले स्थळ वा मोडकळीस आलेल्या डोपडीला घरपन देण्याचे हिरवं स्वप्न याचं पोळा सणावर रंगवलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाने दांडी मारल्याने.आधीच पेरणीसाठी काढलेले कर्ज त्यांत उभे पीक डोळ्यासमोर सोकत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकरी झालेला खर्च या दुष्काळ परिस्थिती फेडावे तरी कसे आणि उंबरठ्यावर येऊन ठेपला पोळा सणावर वर्षभर राबराब राबणाऱ्या बैलाला दुष्काळाने पोटात आणलेला गोळा दाखवावे तरी कसे हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांन समोर उभा असल्याचे खंत मनोहर राठोड यांनी व्यक्त केले आहे.एकीकडे विमा कंपनी शेतकऱ्यांना पाहिजे तसा विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे.तर दुसरीकडे शासनकर्ती जमात शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत बाबतीत मुग गिळून बसल्याने आता परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचे मार्ग अवलंबनार असल्याची भुमिका शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी व्यक्त केली आहे

Powered by Blogger.