आतिवृष्टी ने झालेल्या नुकसान ग्रस्ताच्या यादीत झाशी गावात प्रचंड घोळ
प्रतिनिधी भगवंता चोरे
संग्रामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे तालुक्यातील झाशी गावात घराची पडझड होवून आर्थिक नुकसान झाले परंतु ग्रामसेवक व तलाठी यांनी कोणतीही शहानिशा वा ठिकाणावर जावून पंचनामे न करता अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्तांची यादी ही अयोग्य ,खुर्चीत बसून आपल्या मर्जीतील व जवळच्या लोकांची केल्या गेली त्यामुळे ज्यांचे खरोखर नुकसान झाले आहे अशांवर अन्याय होत आहे. आहे ती यादी तत्काळ रद्द करून वस्तुनिष्ठ यादी तयार करून खरोखर नुकसान ग्रस्तांना मदत होईल अशी नुकसानग्रस्तांची यादी तयार करावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू अशा आशयाचे निवेदन नुकसानग्रस्त गावकऱ्यांनी मा.तहसीलदार संग्रामपूर यांना दिले आहे