सावळी येथील स्व.मा.सरपंच श्री.प्रतापसिंग काशिराम जाधव या मुख्यप्रवेशद्वाराचे भूमिपूजन..
(वाशिम) मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :--
मानोरा तालुक्यातील सावळी येथील जाधव कुटूबातील सर्वात मोठा भाऊ,लोकप्रिय व गावाच्या विकासा करिता तत्पर पुरुष स्वर्गीय मा.सरपंच श्री.प्रतापसिंग का.जाधव यांची ओळख आहे. सरपंच असतानी गावाच्या विकासा करिता केलेली कामे व गावातील लोकासोबत असलेल्या संबंधाची जाणीव ठेऊन गावाच्या वतीने एक विचार मांडण्यात आला की सावळी गावाचे मुख्यप्रवेशद्वार स्वर्गीय मा.सरपंच श्री.प्रतापसिंग का.जाधव यांच्या नावाने असावे.
गावाच्या लोकाचे असलेले प्रेम व त्यांच्या विषयी असलेली प्रतिमा याची दखल घेत त्यांचे चिरंजीव श्री.किशोरभाऊ प्रतापसिंग जाधव यांनी आपल्या वडिला बद्दल लोकाची भावना पाहून स्वर्गीय मा.सरपंच श्री.प्रतापसिंग का.जाधव नाव स्मरणात राहावे, समाजामध्ये त्यांचे कार्य अमर राहावे या उदेशयाने सावळी येथील मुख्य प्रवेशद्वार स्वखर्चाने बाधण्याचे निश्च्य् केला.त्यामुळे दिनाक १५/०९/२०२३ रोजी सर्व जाधव कुटुंबीय तथा गावातील समस्त प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थित मुख्यप्रवेशद्वाराचे भूमिपूजन त्यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई प्र.जाधव यांचे शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी सावळी चे सरपंच श्री.निखिल अंबोरे, पोलीस पाटील श्री.गोपाल शेळके, व सर्व जाधव कुटुंबीय तथा गावातील समस्त प्रतिष्ठीत व्यक्ती व ग्रामपंचयात सदस्य उपस्थित होते. या कार्यामुळे सावळी येथील जाधव कुटूबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.