मराठा समन्वय समिती मोताळा आंदोलनास कोळी महादेव जमात बुलडाणा यांचा जाहीर पाठिंबा
*बुलडाणा:-* मा. मनोज जरांगे पाटिल यांनी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे ते आंदोलन लोकशाही मार्गाने सुरु असताना सुद्धा हुकूमशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रयत्न करून त्या आंदोलनं धारका वरती शासनाने व प्रशासनाने अमानुषपणे हल्ला चडवला या घटनेचा आम्ही निषेध करतो मोताळा येथे मराठा समन्वय समितीच्या वतीने जे अन्न त्याग आंदोलनं सुरू आहे या आंदोलनाला कोळी महादेव जमात बुलडाणा यांचे कडून जाहीर पाठिंबा देत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणासाठी जो ही लढा उभारल्या जाईल त्या लढ्या मध्ये आम्हीं सदैव सोबत असू करीता जाहीर पाठिंबा त्यावेळीगणेश इंगळे,निलेश जाधव,गंगाधर तायडे, नीलेश गवळी,दिपक जाधव,लखन जाधव, अरूण सोनुने,निना इंगळे,श्रीकृष्ण तायडे, योगेश जाधव व असंख्य कोळी महादेव जमात बांधव पाठींबा मध्ये सहभागी होते.