अवैध गोतस्करी तात्काळ बंद करण्यासाठी विश्व हिंदू परिषद चे निवेदन
संग्रामपूर तालुक्यामधील सोनाळा पोलीस पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात आलेवाडी व बावणबीर येथे गोतस्करी गो हत्या सुरू असून वरवट बकाल येथे शनिवारी मोठ्या प्रमाणामध्ये गुरांचा बाजार भरतो शनिवार बाजार दिवशी मोठ्या प्रमाणात अवैध गोतस्करी सुरू असून तात्काळ बंद करण्यात यावे .
या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी लवकरात लवकर गो स्कॉड ची निर्मिती करण्यात यावी असे आज दि:-18/9/23 सोमवार रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल संग्रामपूर प्रखंडा च्या वतीने लेखी निवेदन द्वारे सोनाळा पोलीस स्टेशनं येथे कळवण्यात आले या सर्व गोष्टींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी येत्या 7-8 दिवसांमध्ये तात्काळ कारवाई न झाल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल संग्रामपूर तालुक्याच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद बजरंग दल संग्रामपूर तालुक्याच्या वतीने दिला.