दत्तनगर रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळणार मा. खासदार सुजित विखे पाटील...
श्रीरामपूर( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )
दत्तनगर ग्रामपंचायत स्थापनेपासून जागे अभावी घरकुलयोजने पासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटीलयांच्या विशेष प्रयत्नातून रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. आज रोजी दिल्ली येथे श्री नानासाहेब शिंदे संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा.सुजयदादा विखे पा.यांचे समवेत वरील प्रश्नाबाबत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यापुढेही दत्तनगर गावाच्या विकासासाठी भरीव निधी दिला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले. यासाठी श्री नानासाहेब शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याप्रसंगी पी.एस. निकम,भिमाभाऊ बागुल , राजाभाऊ कापसे , रविआण्णा गायकवाड,बाळासाहेब विघे , जनाभाऊ खाजेकर , शरदभाऊ भणगे प्रदीपभाऊ गायकवाड आदी उपस्थित होते. पी.एस.निकम आभार मानले