दत्तनगर ते गणेश नगर हा रस्ता चांगला व्हावा यासाठी पावन गणपतीला साकडे
श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी
दिनांक २३.०९.२०२३ रोजी रस्त्याचे विघ्न दूर होऊ दे खंडाळा पावन गणपतीला अनवाणी पायी जाऊन साकडे घालण्यात आले दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून दत्तनगर ते गणेश नगर हा 12 किलोमीटर चा रस्ता अतिशय खड्डेमय झाला असून या रस्त्यावरील खड्डे बुजून तो दुरुस्त व्हावा म्हणून आज शनिवार रोजी सकाळी सहा वाजता अनवणी पायाने सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप यांनी दत्तनगर ते खंडाळा आणि पायाने जाऊन पावन गणपती खंडाळा यांच्या दर्शनासाठी जात असताना वरुणराजाने देखील कृपादृष्टी दाखवली भर पावसात अशोक लोंढे यांनी केलेले पण पूर्णत्वास नेले आहे या अगोदर रस्त्यात झाडे लावून खड्ड्यांना हार घालून खड्ड्यांमध्ये बसून मुंडन आंदोलन केले आहेत.
त्याचबरोबर भिक मांगो आंदोलन आत्मा कलेश आंदोलन अशा प्रकारची अनेक आंदोलने झाली तरी पण प्रशासन लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री यांनी दोन कोणीही पाहिलं नाही म्हणून गणेश उत्सवात दत्तनगर ते खंडाळा या ठिकाणी पावन गणपतीचे अन्वनी पायाने पायी जाऊन दर्शन घेतले आणि गणरायांना साकडे घातले आहे की दत्तनगर ते गणेश नगर या रस्त्यावरील खड्डे बुजून या रस्त्याचे विघ्न दूर करावे अथवा २०२४ मध्ये ज्या कोणाच्या मतदारसंघांमध्ये हा रस्ता येत असेल त्याच्या निवडणुकीत देखील विघ्न आणून आपण त्यांना आपल्या या भक्ताने अनवाणी पायाने येऊन जे साकडे घातले आहे .
त्यासाठी या लोकप्रतिनिधींची निवडणुकीमध्ये देखील विघ्न आले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी केले आहे अशोक लोंढे यांच्या विविध आंदोलनाला दत्तनगर गावातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष नेहमीच सहकार्य करत असतात यावेळी आजच्या पायी आंदोलनासाठी आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप ,कुमार दिवे ,प्रीतम मंत्री यांनी सोबत घेऊन या आंदोलनास पाठिंबा दिला