Breaking News
recent

युवती सेनेच्या शहर प्रमुख पत्नीची पतीने केली चाकू भोसकून हत्या

  


गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवसेना ठाकरेगटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद (३०) यांची पतीने मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दोन मुलांच्यासमोर चाकूने भोसकून हत्या केली.रुग्णालयातून घरी गेलेल्या नजद सय्यद यांनी वरच्या मजल्यावर जाऊन बघितले असता राहत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ताहेमिम शेख (३८) असे आरोपी पतीचे नाव असून त्याने हत्येनंतर पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले आहे.कुरखेडा येथील निष्ठावान शिवसैनिक नजद गुलाब सैय्यद यांची मुलगी तथा ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहरप्रमुख राहत सय्यद आपल्या वडिलांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर पती व दोन मुलांसह राहायची. आरोपी पती ताहेमिम नेहमीच राहत हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, यावरून शुक्रवारी मध्यरात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

दरम्यान, संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या ताहेमिम याने पत्नी राहत हीची दोन मुलांसमोरच चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर त्याने नदीवर जाऊन अंघोळ केली व पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. मृत राहत हीचे वडील नजद सय्यद हे प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात भरती होते. पहाटे चहा पिण्यासाठी घरी गेले असता घाबरलेल्या नातवांनी घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी वर जाऊन बघितले असता राहत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून पती ताहेमिमविरोधात तक्रार दाखल केली आहे.

                        आरोपी जामिनावर घरी आला होता

विशेष म्हणजे मृत राहत सय्यद यांचा पती ताहेमिम शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आलेला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर ताहेमिम आणि राहत हे दाम्पत्य राहतच्या माहेरीच राहात होते.

Powered by Blogger.