स्व दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान च्या वतीने नेत्र शिबिर
(प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी ):
स्व दादाभाऊभोसले प्रतिष्ठान, कोंची व दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ सप्टेंबर रोजी कोंची येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिराचे उदघाटन नाशिक येथील निषणांत नेत्र रोग तज्ञ डॉ. अनिल सोनावणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचीत बहुजन आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शैलजा अरुण साबळे ब्राम्हणे उपस्थित होत्या. याच मान्यवरांनी उपस्थित ग्रामस्थ व नेत्र रुग्णांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी संगमनेरसह पंचक्रोशीतील 80 नेत्रांची मोफत तपासणी करण्यात आली तर 12 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली, लौकरच आशा रुग्णांची शस्त्रक्रिया पार पडणार आहे. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कोंची गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले अमूल्य योगदान दिले.