Breaking News
recent

पावसांच्या खंडामळे सोकत असलेल्या पिकांचं पंचनामे करून मदत द्या - मनोहर राठोड



मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड

       मानोरा तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसात खंड शेतकऱ्याची विधायक परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाने दडी मारल्याने सोयाबीन कापूस व तुरीचे पीक पाण्याविना डोळ्यासमोर सोकत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी अधिकारी व महसूल प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी जिल्हाधिकारीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून केली आहे. 

        याबाबत दिलेल्या निवेदनानुसार पावसाच्या अनियमित पणामुळे शेतकऱ्याला अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा बिकट परिस्थितीचा पुन्हा सामना करण्याची वेळ येऊन ठेपली आहे सध्या पावसाने दडी मारल्याने सोयाबीन,कापूस व तूर पीक वाळत चालल्याने शेतकरी हताश झाला आहे.सोयाबीन पीक हे सध्या फुल-शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतांना मात्र पावसाची खूपच आवश्यकता आहे.पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात नक्कीच घट येणार मात्र कापूस,तुर हे पिकेही हातातुन जात असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे.यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झल्याने काही पेरण्या खोळंम्बल्या काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करावी लागली.अशातच आता पावसाने दांडी मारल्याने.आधीच पेरणीसाठी काढलेले कर्ज त्यांत उभे पीक डोळ्यासमोर सोकत असल्याने शेतकरी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे स्थानिक महसूल व कृषी प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.सध्या अखंडित पावसामुळे सोयाबीन चे फुले गळून खाली पडत तर आलेल्या शेंगा परिपक्व होत नाही तर गळून पाण्याच्या मार्गावर आहे ‌तालुक्याती शेतकरी सोयाबीन पिकाच्या भरवशावर अवलंबून असल्याने येणारा काळ कसा लोटवा या विवंचनेत शेतकरी जगत असल्याची खंतही मनोहर राठोड यांनी निवेदनातुन व्यक्त केली आहे.पुढे मुला-मुलीचे लग्न,शिक्षण,शेतीसाठी झालेला खर्च या दुष्काळ परिस्थिती फेडावे तरी कसे एकीकडे विमा कंपनी शेतकऱ्यांना पाहिजे तसा विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे.करीत आहे तेव्हा शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी केली आहे

Powered by Blogger.