वैद्यकीय महाविद्यालय मानोरा येथे देण्यात यावे-मानोरा तालुका कृती विकास समिती कडून मुख्यमंत्री यांना निवेदन.
मानोरा.ता.प्र / बाबूसिंग राठोड:---
वाशीम जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून ते महाविद्यालय मानोरा येथे देण्यात यावे व त्याला जगतगुरू संत सेवालाल महाराज यांचे नाव देण्यात यावे, ग्रामीण रुग्णालय येथे पन्नास बेडची मंजुरी देऊन ट्रामा सेंटल मंजूर करावे अशी मागणी मानोरा तालुका कृती विकास समितीच्या वतीने ५ सप्टेंबर ला सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
वाशीम जिल्हा आकांशीत जिल्ह्यात मोडत असून मानोरा तालुका हा जिल्ह्यात सर्वात मागास तालुका असून या तालुक्यातील नागरिकांना मानोरा येथे आरोग्य सुविधा बरोबर मिळत नाही. तालुक्यात साधी महिला प्रसूतीची सोय नाही. येथील नागरिक यांना यवतमाळ, अकोला व वाशीम येथे रुग्ण घेऊन गेले तर सत्तर ते शंभर किलोमीटर वर घेऊन गेल्यावर उपचार होते त्यामुळे मानोरा तालुक्यात वैद्यकीय महाविद्याल होणे खूपच गरजेचे असून तालुक्यात महाविद्यालय करिता शासकीय ई क्लास जमीन उपलब्ध आहे. तसेच महाविद्यालयास जगतगुरू संत सेवालाल महाराज यांचे नाव देण्यात यावे. ग्रामीण रुग्णालयात ५० खाट ला मंजुरी देऊन येथील रिक्त पदे भरण्यात यावी व ट्रामाकेअर सेंटल देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन मानोरा तालुका कृती समितीच्या वतीने सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी पालकमंत्री संजय राठोड, आ. राजेंद्र पाटणी, स्वीस साहायक दिनेश उपाध्ये, प्रकाश राठोड, राजू गुल्हाने, ईफतेखार पटेल, डॉ श्याम जाधव, अभिजित पाटील, अमोल तरोडकर, अनिल राठोड, वसंत राठोड, महेश जाधव, योगेश देशमुख, आरिफ भाई जेबी शेख, निखिल वानखेडे, गजानन मीराशे, निलेश राठोड, आदी मान्यवर उपस्थित होते.