Breaking News
recent

वाईगौळ येथील तांड्यात स्व.देविसीगजी नाईक या नायकित तिज उत्सव साजरा

  

मा.ना.संजयभाऊ राठोड साहेब मृद व जलसंधारण मंत्री पालकमंत्री यवतमाळ वाशिम यांची तिज उत्सवाला भेट.

मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :--- (वाशिम) भारतात बहुतांश राज्यात बंजारा समाज विखुरलेला आहे.या समाजाची संस्कृती आगळी-वेगळी आहे या समाजामध्ये दिवाळी,दसरा,होळी इ.सणा प्रमाणे अनेक सण साजरे केले जातात. बंजारा समाजात पारंपारिक "तिज उत्सव" या सणाला अतिशय महत्त्व आहे. समाजाची परंपरा आणि संस्कृती जतन होणे महत्त्वाचे आहे. याच उदात्त हेतूने नायक स्व.देविसीगजी लछु नाईक वाईगौळ ता मानोरा जि वाशिम यांच्या 

नायकीतील व तांड्यातील मंडळी येथील सर्व रहीवाशी बंजारा बांधव एकोप्याने उत्सव साजरे करत असतात. दिनाक ३०/०८/२०२३ रोजी आमचे पारंपारिक तिज उत्सवाला वाईगौळ तांड्यात सुरूवात झालेली असून समाजाच्या रितीरिवाजा प्रमाणे "तिज रोपन" करण्यात आले आहे. तिज रोपन झाल्या पासून तांड्यातील मुली,महिला,गावातील मंडळी दररोज नाच गाणे करतात. तांड्यातील मुली रोज तिज रोपनाला समूहाने डफडीच्या तालाने पाणी टाकण्या करिता सर्वांच्या घरी फिरतात. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाते. 

     या तिज उत्सव कार्यक्रमाला दिनाक ८ सप्टेंबर २०२३ रोजी मा.ना.संजयभाऊ राठोड साहेब मृद व जलसंधारण मंत्री पालकमंत्री यवतमाळ वाशिम यांनी भेट दिली. स्व.देविसीगजी नाईक वाईगौळ तांड्यात तिज उत्सव कार्यक्रमाला भेट देऊन तांड्यातील मुली,महिला,गावातील मंडळी यांचा उत्साह दिवगुणीत झाला. बंजारा समाजाचे रितीरिवाजा प्रमाणे "तिज रोपन" केले पाहिजे व समाजाची परंपरा आणि संस्कृती जतन होणे महत्त्वाचे आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी तांड्यातील मुली,महिला,गावातील नागरिक मंडळी होती. बंजारा समाजाच्या भगिनी संस्कृती जपत आपला आनंद साजरा करतांनाचे एक क्षण..

Powered by Blogger.