भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किसान सेल तालुका नांदुरा च्या नियुक्त्या जाहीर
माननीय आमदार श्री. राजेशजी एकडे साहेब, किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मा.अतुल क्षीरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप बाप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात मा. आमदार राजेशजी एकडे यांच्या हस्ते किसान काँग्रेस नांदुरा च्या नियुक्त्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी किसान काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पदी प्रमोद गावंडे , विजय मुऱ्हे, प्रकाश ठोंबरे, तालुका कोषाध्यक्ष सद्दाम खान ,तालुका संघटक सत्यवान खवले ,तालुका प्रसिध्दी प्रमुख अशोक वाघ, तालुका सरचिटणीस रामेश्वर काळे , राजेंद्र चांभारे,तालुका सचिव अमर गाडे,सहसंघटक पदी सारंगधर खवले यांची निवड करण्यात आली. *यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भगवान भाऊ धांडे ,जिल्हा सरचिटणीस निलेश भाऊ पाऊलझगडे, किसान काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संतोष होणाळे, जयंता चरखे,संजय इटखेडे,मनोहर दळवी,भागवत काळे,अनंता लासुरकार, विनोद जंजाळ, दिनकर बावस्कार ,मयूर बोंबटकार व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*