Breaking News
recent

विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

 

 पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. तरुणीकडून आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

लखन महादेव भिसे (रा. इंदापूर रस्ता, पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे ) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी पुण्यात राहायला आहे. आरोपी भिसे आणि तिची विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. भिसेने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिच्याकडून आठ लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेतले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली.

फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. भिसेविरुद्ध फसवणूक, बलात्कार, अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के तपास करत आहेत.

Powered by Blogger.