भुसावल -- नागपूर पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी- मागणी
बिस्वा नागपूर ते भुसावळ ही पॅसेंजर गाडी 2020 च्या कोरोना काळाच्या अगोदर व्यवस्थित सुरू होती. परंतु कोरोना काळापासून बंद करण्यात आली असून प्रवाशांचे हाल होत आहे. ही पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू करण्याकरिता अंबिका फाउंडेशन अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी नुकतेच डी. आर. एम. भुसावळ रेल्वे विभाग यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. सदर निवेदनात नमूद केले आहे की, भुसावल ते नागपूर पॅसेंजर गाडी कोरोना काळापासून म्हणजे 2020 पासून बंदच आहे या बिस्वा ब्रिज रेल्वे स्थानक व परिसरातील 15 ते 20 खेडी लागून आहे.
सदर गाडी पूर्ववत सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी तसेच बिस्वा ब्रिज स्थानक आवारात नेहमीच मालगाड्या उभ्या असतात. या रेल्वे स्थानकात दादरा पुल नसल्याकारणाने वयवृद्ध इसम महिला बालगोपाल यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे तरी बिस्वा ब्रिज स्थानकात दादरा पुल बसहवुन मिळावा. व प्रवाशांना होत असलेला त्रास कमी करावा सध्यास्थितीत भुसावल, नारखेड, व भुसावल वर्धा या दोन्ही मेमो पॅसेंजर गाड्या आहेत. परंतु गाड्यांना डब्बे फार कमीच येतात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दसरा दिवाळी लक्षात घेता सदर गाडीचे डबे वाढवण्यात यावे. पूर्ववत भुसावळ नागपूर पॅसेंजर सुरू करण्यात यावी अशी मागणी आहे.