Breaking News
recent

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर बलकर झाला पलटी



 पनवेल प्रतिनिधी 


19 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास मुंबई- पुणे  द्रुतगती महामार्गावर  पुणे लेनवर  कि.मी 01/600 येथे खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत विना दुखापत अपघातात . बलकर पलटी झाला आहे. 

          यातील बलकर ट्रक क्रमांक एम एच 04 केयू 2436 यावरील चालक  विकास साव (वय 26 वर्ष राहणार झारखंड) याच्या ताब्यातील बलगर ट्रक  मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबई बाजूकडे तिसऱ्या  लेनने चालवीत घेऊन जात असताना  किमी 01.600 येथे आले असता त्याच्या समोरील अज्ञात  वाहनाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे बलगर ट्रक  चालक यांचे त्यांच्या बलगर ट्रकवरील नियंत्रण सुटून रेलिंगला धडकून गाडी पलटी होऊन खाली निघून गेली आहे. या अपघातामध्ये कोणाला काहीही दुखापत झालेली नाही तसेच अज्ञात वाहन न थांबता निघून गेले आहे. अपघाताच्या ठिकाणी  पळस्पे मोबाईल वरील स्टाफ व आय आर बी स्टाफ हजर होते.

Powered by Blogger.