Breaking News
recent

धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी घनश्याम राजेंद्र ढोले ह्याचा वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

 


चिखली प्रतिनिधी :

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अमरावती मधील अनंत वाडी येथील घनश्याम राजेंद्र ढोले याने समर्थवाडी संस्थान आणि विश्वस्त यांच्या वर केलेल्या धांधात खोट्या व निराधार आरोपांमुळे आमच्या सर्व त्यांना पुज्य माननार्या भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी चिखली पोलीस स्टेशन येथे भाविकांनी लेखी स्वरुपात तक्रारी द्वारे केली आहे.

समर्थ वाडी अमरावती हे धार्मिक संस्थान असून राज्यासह देशभरात ह्या संस्थानचा भाविक वर्ग मोठ्या संख्येने पसरला आहे .  कोणत्याही  प्रसिद्धीच्या मागे न लागता संस्थानचे प्रमुख विश्वस्त असलेले 95 वर्षीय परम पूज्य भाऊसाहेबांनी आपल्या हयातभर आयुष्यात  परमपुज्य योगीराज गोविंद महाराज माकनेरकर यांनी घालून दिलेल्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरा अविरत भाविक भक्तांसाठी  सुरू ठेवल्या आहेत. त्याकरिता त्यांनी आपल्या हयातीत अपारश्रम व कष्ट सोसले असून  असे पूज्यनिय भाऊसाहेब आमच्या सर्व भाविकांसाठी दैवत असून  आमच्या परमपुज्य दैवतावर  घनश्याम राजेंद्र ढोले  यासारख्या  विकृत मानसिकता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने धांदात खोटे तथा तथ्यहीन आरोप केल्याने आमच्या धार्मिक भावनांना ठेच पोचली आहे . अशा भावना व्यक्त करत अशा विकृत आणि विघ्न संतोषी मनोवृत्तीच्या  व्यक्तीवर आमच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलिसांनी  तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी चिखली पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी उपस्थित भाविक मंडळींनी केली आहे.  तक्रार देण्यासाठी भाविक वर्ग  मोठ्या संख्येने उपस्थित होता .

Powered by Blogger.