नवरात्री निमित्त वैभवी चा अल्बम "आंबा माझी पालकीत बसली "
श्रीगोंदा प्रतिनिधी
लिपणगांव येथील ४ थी मद्दे शिकणारी वैभवी भरत बाबर हिचा "आंबा माझी पालकीत बसली " हा अल्बम रिलीज झाला असून त्या मधील वैभवी च्या आवाजातील आंबा माझी पालकीत बसली या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुप्रसिद्द संगीत कार अक्षय गरडकर व योगेश भवाळ यांनी संगीत दिले असून लेखक भरत बाबर आहेत त्याना विशेष सहकार्य साजन पाचपुते, किरण कुरूमकर, विजू खुडे, अनुराधा नागवडे, डॉ. लाड, कृष्णा ढवळे, विनोद गायकवाड, शेंडगे सर, शिंदे सर, व क्रिकेट पटू हार्दिक पांड्या, यांचे सहकार्य लाभले. वैभवी चे श्रीगोंद्यातुन कौतुक होत आहे.