महात्मा गांधी जयंती निमित्त आसनगाव रेल्वे स्थानकात राबवण्यात आले स्वच्छता अभियान
सुनिल केदारे ठाणे प्रतिनिधी
सम्यक प्रबोधन संघ संचलित,न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शहापूरच्या वतीने आसनगाव रेल्वे स्टेशन येथे "स्वच्छता ही सेवा" या अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त 3 ऑक्टोबर 2023 रोजी स्वच्छता अभियान राबवले. या कार्यक्रमासाठी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर रुपेश यादव साहेब तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. सौ सुनंदाताई प्रधान मॅडम.सचिव मा. स्वप्निल प्रधान सर या उपस्थित होते तसेच आसनगाव रेल्वे स्टेशन मधील आर.पी.एफ. स्टाफ व स्वच्छता कर्मचारी व इतर स्टाफ यांनी यामध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधी यांचे विचार व स्वच्छतेचा अभियान याबाबतचे महत्त्व जागृत व्हावे या करिता ज्युनिअर कॉलेजने व शाळेने हा आगळावेगळा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी साजरा केला .या कार्यक्रमासाठी डॉ. बी .बी. प्रधान सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शिवानी झा मॅडम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली .यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. याप्रसंगी रेल्वे स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल शिवानी जा मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अनमोल सहकार्य करून व सहभागी घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार शिवानी झा मॅडम यांनी व्यक्त केले.