पिटसई कोंड येथील परीसरात बिबट्याची दहशत..
तळा : तळा तालुक्यातील पिटसई कोंड येथील नागरिक सोनल नितीन तांदलेकर, रसिका रघूनआथ तांदलेकर, यांनी सकाळी साडेदहा ते आकराच्या दरम्यान दहा ते पंधरा फुटांच्या अंतरावर प्रत्यक्ष बिबट्या बघतल्याची बातमी गावांमध्ये सांगीतली त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या मनात भिंतीचे वातावरण आहे. रघूनाथ पांडुरंग तांदलेकर यांच्या घराच्या मागच्या दारावरून बिबट्याने प्रकाश शिंदे यांच्या घराच्या जोत्यावर उडी मारली नागरिकांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून पळ काढला. वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करावे अशी नागरिकांची मागणी होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना काळजी घ्यावी.