वयोवृद्धाला न्याय मिळत नसल्याने महसूल विभागाच्या कायद्याचे पुस्तके फाडून लीगल फायटर फाउंडेशन नेला निषेध
मलकापूर 21/10/23 न्यायासाठी चार दिवसापासून तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसलेल्या वयोवृद्धाला न्याय मिळत नसल्याने महसूल विभागाच्या कायद्याचे पुस्तके फाडून लीगल फायटर फाउंडेशनने निषेध व्यक्त केला आहे.
स्थानिक तहसीलदार यांनी वडोदा शिवारातील बौद्ध भक्खू यांची वर्ग २ ची शेती वर्ग १ मध्ये परिवर्तित करून स्थानिक भू माफियास यांना विकण्यास मदत केल्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लीगल फायटर फाउंडेशनचे अध्यक्ष एडवोकेट स्नेहल तायडे व उपोषण करते सोनाजी झनके यांनी केली आहे.
आपल्या तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की वरील वर्ग 2ची शेती ही जर कायदेशीर रित्या परिवर्तित केली असेल तर वडोदा शिवारातील, भागातील इतर शेतकऱ्याच्या शेत्या देखील वर्ग १ मध्ये परिवर्तित करण्यात याव्या
तसेच सोनाजी शिवराम झनके वय ६९ वर्ष धंदा शेती रा.धरणगाव ता. मलकापुर जि. बुलढाणा यांचे तेलखेड शिवारातील गट क्र.१३८ मधील ६० आर जमिनीवर एका व्यक्तीचे नावाची बेकायदेशीरपणे नोंद घेणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करावेत.
दि.३०/११/२०१९ रोजी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार सोनाजी शिवराम झनके यांचे मौजे तेलखेड शिवारातील गट क्र.१३८ मधील ६० आर जमिनीच्या नोंदी दुरुस्त करून, ७/१२ पूर्वी प्रमाणे करण्यात यावा यासाठी चार दिवसापासून उपोषणात बसलेले
सोनाजी शिवराम झनके या 69 वर्षाच्या वयोवृद्धाला न्याय मिळत नसेल्याने महसूल विभागाच्या कायद्याचे पुस्तके काही कामाचे नसल्याने त्यांना फाडून लिगर फाइटर फाउंडेशनचे अध्यक्ष एडवोकेट स्नेहल तायडे, सनी मगरे यांनी तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला आहे .