कु.संस्कृती संदीप आडे हिने पहिल्याच प्रयत्नात सुवर्णं पदक प्राप्त
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :- (वाशिम)
मानोरा या तालुक्यातील बंजारा समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथील श्री.संदीप मुकिंद आडे यांची मुलगी मुंबई येथे झालेल्या viva v i b g y o r कडून आंतर शालेय आयोजित ज्युडो स्पर्धेत तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील कु.संस्कृती संदीप आडे,हिने पहिल्याच प्रयत्नात सुवर्णं पदक प्राप्त केले,सदर यशाचे श्रेय छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री रविभुषण कदम, सर आणि पालक संदीप आडे व प्रीती आडे तसेच आजी आजोबा यांना दिले.
संस्कृती आडे ही तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.मुकिंद रामचंद्र आडे यांची नातं महसूल विभागात कार्यरत असलेले संदीप आडे यांची मुलगी आहे. दिग्रस येथे श्री कदम सर यांची ज्युडो प्रशिक्षण करिता निशुल्क अकॅडमी चालवीतात. या श्रेयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.