Breaking News
recent

२२ जानेवारी ला संपूर्ण भारतभर साजरी होणार दुसरी दिवाळी- प्रकाश बोदडे

 


    नोव्हेंबर महिन्यात आपण दरवर्षी येणारी दिवाळी साजरी केली आता आता दुसरी दिवाळी २२ जानेवारी ला संपूर्ण भारत भर साजरी केली जाणार आहे कारण त्या दिवशी अयोध्ये मधे प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिरात हजारो साधू संतांचे  आशीर्वादाने श्रीरामचंद्रप्रभूंचे मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी होणार आहे त्या करिता जनमानसात आपण सर्वांनी जनजागरण करावे असे विचार प्रकाश बोदडे सर भा.ज.पा जिल्हाध्यक्ष (शिक्षक आघाडी) यांनी विठ्ठल मंदिर सोनाळा येथे आयोजित अक्षत कलश यात्रेचे भव्य शोभायात्रेचे समारोप प्रसंगी काढले यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलश यात्रेची काल भव्य शोभायात्रा सोनाळा शहरात निघाली स्थानिक गजानन महाराज मंदिर संस्थान पासून १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सदर कलश यात्रा सुरू झाली 


    यावेळी कृष्णानंद भारती महाराज खाकी आखाडा वारी  हनुमान यांचे शुभहस्ते कलश वितरण दुर्गा वाहिनीचे भगिनी कडे केला गेला पुढे ही कलश यात्रा गजानन महाराज मंदिर प्रकाश बाबा चौक संत तुकाराम महाराज चौक श्रीराम मंदिर येथून विठ्ठल मंदिरात या यात्रेच्या समारोप झाला या प्रसंगी शेकडो चे संख्येने रामभक्त तथा दुर्गा वाहिनी चे भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मधे विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीपभाऊ वडोदे,विनोद राठोड,प्रमोद खोडे प्रकाश गोतमारे,मोहन ठोकणे हे होते पुढे बोदडे म्हणाले की २२ जानेवारी रोजी आपले गावालाच अयोध्या समजून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करायचे आहेत १ ते १५ जानेवारी पर्यंत श्रीराम नामाचा जप घरोघरी वा मंदिरात करायचा आहे 

    संपूर्ण देशभर याच दिवशी दिवाळी साजरी होत आहे घरोघरी दिवे लावले जातील त्यामुळे २२ जानेवारी ला या वर्षात दुसऱ्यांदा देशात दिवाळी साजरी होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्रामपूर तालुका बाल कार्य प्रमुख शुभम खंडेलवाल यांनी केले.या कार्यक्रमाला सोनाळा सरपंच हर्षल खंडेलवाल ज्येष्ठ भाजपा नेते गणेशभाऊ गोतमारे,भास्करभाऊ शेटे, जानराव गोरे,रमेश खोकले,देशपांडे संघ परिवार क्षेत्रातील रा.स्व.संघ विहिप बजरंग दल भाजपा आदींचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित  होते

Powered by Blogger.