विधान परिषद सदस्य सत्यजित दादा तांबे यांची भेट
संगमनेर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )-विधान परिषद सदस्य सत्यजित दादा तांबे यांची भेट आरोग्यमंत्री मा. तानाजी सावंत यांच्यासोबत बैठक झाली. गेल्या आठवड्यात मी विधानपरिषदेत मांडलेल्या प्रश्नांबाबत तातडीने बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार! या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा उपसंचालक नाशिक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक डॉ. चारुदत्त शिंदे हे अधिकारी उपस्थित होत
या बैठकीत मी केलेल्या मागण्या व त्यांचा प्रतिसाद
मुद्दा 1 - सिन्नर तालुक्यातील वावी येथे तातडीने ट्रॉमा सेंटर मंजूर करून काम सुरु करावे.
उत्तर - हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आतच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.
मुद्दा 2- संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे किंवा बोटा येथे ट्रॉमा सेंटर उभारावे.
उत्तर - आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना जागेबाबत पडताळणी करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
मुद्दा 3 - महात्मा फुले जनआरोग्य योजनेत डेंटल, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक या उपचारांचाही समावेश करण्यात यावा
मुद्दा 4 - महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रुग्णालयांनी उपचार द्यावेत, यासाठी त्यांना मिळणाऱ्या निधीत वाढ करण्यात यावी, जेणेकरून सर्वच रुग्णालये ही योजना राबविण्यासाठी उत्सुकता दाखवतील.
उत्तर - यावर खासगी व सरकारी रुग्णालयांतील उपचार दरांचा तुलनात्मक आढावा घेऊन योजनेंतर्गत रुग्णालयांना उपचारांचा दर वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मुद्दा 5 - महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या रुग्णालयांची यादी आरोग्य विभागाच्या Website वर जाहीर करण्यात यावी.
उत्तर - योजनेतून Blacklist करण्यात आलेल्या रुग्णालयांची यादी सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी, यासाठी संकेतस्थळ अधिक सुलभ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.