आंतरराज्य मोटार सायकल चोरट्यांच्या स्थागुशाने आवळल्या मुस्क्या ४२ दुचाकीसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त
जळगाव जा. - जिल्हयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. तर चोरीच्या मोटार सायकलचा तपास करीत असतांना स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल ४२ दुचाकी अंदाजे किंमत २१ लाख रूपये असा मुद्देमाल चार आरोपींकडून जप्त करण्यात आला.
जिल्हयामध्ये होणाऱ्या मोटार सायकल चोरीच्या घटना पाहता जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक, खामगांव अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा बि.बी. महामुनी यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक स्थापन करुन मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा अशोक लांडे यांचे नेतृत्वामध्ये पथक स्थापन करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कारवाई सुरु करण्यात आली. सदर पथकाने अभिलेखावरील आरोपी तपासले तसेच गोपनिय बातमीदार कार्यान्वित केले. दरम्यान पथकास मिळालेल्या गोपनीय व खात्रीशीर माहितीनुसार शत्रुघ्न रामचंद्र सोळंके (वय २८ वर्ष) रा. पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद ह.मु. रिधोरा ता. मोताळा. गंगाराम इकराम पावरा (वय २० वर्षे), रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव तुळशीराम इकराम पावरा (वय २४ वर्ष) रा. हलखेडा
ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव, सिताराम लेदा मुझाल्दे (वय २४ वर्ष) रा. शिरवेल महादेव ता. भगवानपुरा जि. खरगोन मध्यप्रदेश या आरोपीतांकडून विविध कंपनीच्या ४२ दुचाकी अंदाजे किंमत २१ लक्ष रूपये त्यात बुलढाणा जिल्ह्यातील ६, जळगांव जिल्ह्यातील ९, नाशिक जिल्हयातील ४ तर मध्यप्रदेश मधील १६ अशा मोटार सायकल जप्त केल्या. यामध्ये ७ मोटार सायकलचा अभिलेख मिळून आला नाही.
वरील नमूद चारही आरोपींना तपास दरम्यान अटक करण्यात आली असून सदरचा तपास पो.स्टे. जळगांव जामोदचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांचे
मार्गदर्शनात सपोनि सागर भास्कर व पोलीस अंमलदार उमेश शेगोकार हे करीत आहेत. आरोपींपैकी १ ते ३ यांना जळगांव जामोद न्यायालयात हजर केले असता तपासाची गांभिर्यता पाहता न्यायालयाने त्यांना दिनांक २१ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर आरोपी क्र. ४ ला आज अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई स्था.गु.शा. बुलढाणाचे अशोक एन लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वात नंदकिशोर काळे सपोनि, निलेश सोळंके सपोनि, श्रीकांत जिंदमवार पोउपनि, पोलीस अंमलदार रामविजय राजपूत, दशरथ जूमडे, दिपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, अनंत फरतडे, दिपक वायाळ, मनोज खर्डे, चालक पोकों विलास भोसले, सुरेश भिसे, सायबर पो.स्टे. चे राजु आडवे, अमोल तरमळे, संदीप शेळके व योगेश सरोदे यांनी केली.