Breaking News
recent

नांदुरा येथे बोगस डॉक्टर ला अटक

 

कुठलीही पदवी,परवाना नसताना करत होता औषध विक्री व उपचार

नांदुरा (शहर प्रतिनिधी)

 येथील नवीन बस स्थानकासमोरील दीपक हॉटेलमध्ये एक बोगस डॉक्टर विनापरवाना व कोणतीही पदवी नसताना औषध विक्री करीत असल्याचे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यातून वीस बॉक्स औषध बॉटल, प्लास्टिक पुड्यांमध्ये पिवळसर, राखाळ्या रंगाची भुकटी आढळून आल्याची घटना १६ डिसेंबर रोजी दुपारी ३.२०  वाजे दरम्यान घडली 

याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मीनारायण जैस्वाल यांनी नांदुरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की दीपक हॉटेलमध्ये आरोपी बोगस डॉक्टर शेख युसुफ शेख शौकत वय ४२ वर्षे रा अंबिकापूर/ चितोडा ता खामगाव याच्यावर छापा मारला असता तो औषध विक्री करताना मिळून आला यावरून त्यास डॉक्टर असल्याबाबतचा परवाना व डिग्री बाबत विचारणा केली असता त्याने एक कागद दिला त्यावर इंडियन कौन्सिल अँड बी होमिओपॅथी सिस्टीम ऑफ

 एम इ डी असे हेडिंग होते तर त्याचा सर्टिफिकेट नंबर १००७ रजिस्ट्रेशन  दिनांक ३०/०४/ १९९४ रजिस्ट्रेशन नंबर १२४७०/ १९८८ असल्याचे दिसून आले तसेच बोगस डॉक्टरचे आधार कार्ड तपासले असता त्याची जन्मतारीख २/६ / १९७८ नमूद असून रजिस्ट्रेशन दिनांक ३० एप्रिल ९४ असल्याने तो त्यावेळी १६ वर्षाचा दिसत असल्याने व आरोपी डॉक्टर हा मान्यता प्राप्त असलेल्या विद्यापीठाच्या सूचीमध्ये नमूद असलेल्या कोणत्या विद्यापीठाचे नोंदणी प्रमाणपत्र , वैद्यकीय अहर्ता तसेच औषधी विक्रीचा कोणताही परवाना जवळ नसताना त्याच्याजवळ २० बॉक्स मध्ये हेक्सा आलोव्ह वीरा ,हेक्सा कफकिल  आणि विदुरिक सिरप बॉटल तसेच प्लास्टिक पुड्यांमध्ये राखाडी व पिवळसर रंगाची  भुकटी व बॉटलमध्ये लाल रंगाचा द्रव पदार्थ मिळून आला तसेच एक पांढऱ्या रंगाची टोयोटा  कार क्रमांक एम एच  ०२ सी एच १७ २९ सुद्धा हस्तगत करण्यात आली त्याच्या ताब्यातून एकूण एक लाख ६८हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याप्रकरणी नांदुरा पोलिसात बोगस डॉक्टर शेख युसुफ शेख शौकत याच्याविरुद्ध वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ वैद्यकीय व्यवसाय अधिनियम २०००च्या ३३(१), वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३८ तसेच औषधी द्रव्ये,तिलस्मी उपचार   (आक्षेपार्ह जाहिरात) अधिनियम १९५४ च्या कलम ४,७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून या बोगस डॉक्टर प्रकरणाचा पुढील अधिक तपास पीएसआय महादेव धंदरे करीत आहेत.

Powered by Blogger.