Breaking News
recent

फेथ गॉस्पेल सेंटर ए जी चर्च मध्ये नाताळ सण उत्साहात साजरा.

 


श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )

श्रीरामपूर-येथील फेथ गॉस्पेल सेंटर ए जी चर्च आदर्शनगर,श्रीरामपूर ह्या चर्च मध्ये ख्रिस्तजयंती ख्रिसमस नाताळ सण चर्चचे परमुख धर्मगुरू रेव्ह विजय केदारी यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी  शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते, नाताळ सणानिमित्त शहरातील अनेक मान्यवरांनी चर्चला भेट देऊन उपस्थित सर्व ख्रिस्ती बांधवाना नाताळच्या शुभेच्छा दिल्या,त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर विधानसभेचे आमदार मा.लहुजी कानडे, माजी नगराध्यक्षा मा.अनुराधाताई आदिक, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व माजी उपनगराध्यक्ष मा.करणं ससाणे,माजी उपनगराध्यक्ष दिलीप नागरे,राष्ट्रवादीचे लकी सेठी,सामाजिक कार्यकर्ते विजय शेलार,श्री भांड,डॉ.विवेक मकासरे आदिनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व मान्यवरांचा चर्चेचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह विजय मार्टिन केदारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते यावेळी महिला , पुरुषांसाठी व लहान मुलांसाठी ख्रिस्तजयंती निमित्य गीतगायन स्पर्धा,नृत्यस्पर्धा,चमचालिंबू स्पर्धा,संगीतखुर्ची स्पर्धा तसेच बायबल सामान्यज्ञान स्पर्धेचे आ योजन करण्यात आले होते.सर्व स्पर्धकांना चर्चच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभीजीत केदारी,सुयश मकासरे,आशुतोष केदारी,निलेश वेव्हारे, अभिषेक पडघलमल,विकास मकासरे छाया घोरपडे,संगीता मकासरे,श्री तांबे,ग्याब्रिएल केदारी,सुनील शिंगाडे,स्वप्नील वाघमारे,सनी वाघमारे,सिस्टर ठोंबरे,मंगल औटी,मीना लबडे, प्रीती कांबळे, तृप्ती मकासरे,श्रद्धा केदारी,वैशाली केदारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एस कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन विश्वरंजन मकासरे यांनी मानले.

Powered by Blogger.