कोळी जमातीला घटनादत्त अधिकार असताना सुद्धा जातीय वैमनस्य निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी महाराष्ट्र कोळी समाज संघाची निवेदनाद्वारे मागणी
मलकापुर:-गेल्या मागील दिवशी आदिवाशी पारधी क्रांती संघटना मलकापुर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी महसूल विभाग यांना निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनात नमुद आहे की नामसाधम्मर्यामुळे कोळी समाजाला मिळालेले अनुसुचित जमातिचे जात प्रमाणपत्र रदद करावे व त्या जात प्रमाण पत्राच्या आधारे त्या जातींना कोणताही शासकीय लाभ देण्यात येवू नये तसेच त्यांना जात प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येऊ नये असे निवेदनात नमूद केले आहे तरी वरील विषय कोणत्या भारतीय राज्य घटनेवरील आधाररेखीतवर निवेदनाद्वारे मागणी केली आहे या विषयाच सखोल चौकशी करण्यात यावी भारतीय राज्य घटनेतील कलम 342 नुसार कोळी जमाजातील महादेव कोळी,टोकरे कोळी,मल्हार कोळी या जमाजातील केंद्रातील अ.नं. 28,29,30 नुसार आरक्षण देण्यात आलेले आहे व बुलढाणा जिल्ह्याच्या केंद्र शासनाच्या यादीत कोळी महादेव ही जमात अनुसूचित जमात दर्शविलेली आहे तरीपण कोळी समाजाला मिळालेले अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र रद करण्याची मागणी आदिवाशी पारधी क्रांती संघटना करत असून दोन्ही समाजामध्ये द्वेष निर्माण होण्याची शक्यता आहे तरीया सर्व विषयाची योग्य चौकशी करावी व चुकीची मागणी करून समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी या संदर्भात निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आले.यावेळी बुलढाणा जिल्हा युवा महिला आघाडी रोहिनीताई इंगळे,जिल्हा कार्यध्यक्ष शुभम घुले,तालुका युवा अध्यक्ष विजय कांडेलकर,तालुका युवा सचिव विलास भोलनकर मोताळा उपाध्यक्ष प्रवीण जाधव,संजय सुरडकर तसेच कोळी समाज बांधव व महाराष्ट्र कोळी समाज संघ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.