Breaking News
recent

पेसोडा पुर्णा नदीपात्रातून होत असलेली अवैध रेतीची वाहतूक बंद करा

 

रेती वाहतूक बंद न  झाल्यास किसान सेनेच्या वतीने आंदोलन

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी

पेसोडा पूर्णा नदीपात्रातून दररोज  दिवसाढवळ्या शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन होत आहे वीस ते पंचवीस वाहने टिप्पर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने दररोज शेकडो ब्रास अवैधरित्या  रेतीचे वाहतूक करीत आहेत  पेसोडा गावापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर कवठळ गावात तलाठी कार्यालय आहे . तरीसुद्धा पेसोडा गावामधून केनी मशीनच्या सहाय्याने रीती उपसा सुरू आहे  मात्र संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत तसेच महसूल प्रशासन सुद्धा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे तात्काळ पेसोळा पूर्णा नदी पात्रामधून होत असलेली अवैधरित्या होत असलेली रेतीची वाहतूक तात्काळ बंद करा अशा मागणीचे निवेदन किसान सेना संग्रामपूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना २८ डिसेंबर रोजी  निवेदन देण्यात आले आहे .

सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की  गद दोन ते तीन महिन्यापासून या नदीपात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करीत असलेल्या   अवैध रेती  वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसुल विभाग  कारवाई करीत नसल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे जेव्हा नागरिक किंवा राजकीय पदाधिकारी व पत्रकार अवैध रेती वाहतूक सुरू असल्याबाबत तहसीलदारांकडे भ्रमणध्वरीद्वारे संपर्क करतात तेव्हा तहसीलदार साहेब हे फोन उचलत नाहीत

त्यामुळे एका प्रकारे महसूल प्रशासन हे रेतीमाफी यांना अभय देत आहे असे यावरून दिसून येते महसुल विभाग व रेती  माफियामध्ये आर्थिक देवाण-घेवाण असल्यामुळे महसूल विभाग कारवाई करत नाही यावरून दिसून येते त्यामुळे तात्काळ पेसोळा येथे पूर्णा नदी पात्रातून होणारी अवैध रेती वाहतूक तात्काळ थांबावी अन्यथा आम्ही तीन दिवसानंतर संग्रामपूर तहसील कार्यालयात लोकशाही मार्गाने आंदोलन करू इशाराही या निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर शिवसेना उ.बा.ठा किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे, शुभम घाटे शहर प्रमुख, , विजय मारोडे उप ता प्रमुख, राहुल मेटांगे तालुका संघटक, रामदास मोहे,पंकज मिसाळ सरपंच,शेख वसीम शेख लुकमान माजी सरपंच , धनंजय अवचार,मुरली इंगळे ,धनसिंग ठाकूर , नंदकिशोर अढाव, मंगला दाते, जितु भाऊ तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.

Powered by Blogger.