सौरभ गदिया यांनी मिशन ड्रीम्स मिस्टर इंडिया किताब पटकावला
श्रीरामपूर( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
श्रीरामपूरच्या सुपुत्र सौरभजी गदिया याने अलीकडेच कोलकत्ता येथे मिशन ड्रीम्स मिस्टर इंडियाचा किताब पटकावला.कोलकत्ता शहरात २१ ते २३ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली.यात ३२ स्पर्धक होते.सौरभजी हे श्रीरामपूर मधील नामांकित विधीज्ञ आहेत.वकिली बरोबर त्यांना मॉडेलिंगची आवड आहे.काही महिना पूर्वीच त्यांनी मिस्टर महाराष्ट्र हा किताब देखील पटकावला आहे.त्यांनी अनेक वर्षापासून केलेली मेहनतीचे आज हे फळ आहे.यातून श्रीरामपूरकरांनी प्रेरणा घेतली पाहिजे,इच्छा व मेहनत करण्याची तयारी असली तर मनुष्य यशस्वी निश्चित होतो. श्रीरामपूरकरांना श्री सौरभजी यांचा गर्व आहे व निश्चितच ते पुढील वर्षी मिस्टर एशिया हा किताब देखील पटकावतील.
आज सौरभजीना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी भारतीय जनता पार्टीचे श्री केतनजी खोरे पाटील, दैनिक स्नेहाप्रकाशचे कार्यकारणी संपादक श्री स्वामीराजजी कुलथे,पत्रकार श्री सुरेशजी कांगोने पाटील,दैनिक सार्वमतचे श्री दिपकजी उंडे पाटील, ग्रॅज्युएट चहा व लस्सीचे संचालक श्री राजेंद्रजी लांडे पाटील, प्रसिद्ध व्यावसायिक श्री योगेशजी जाधव पाटील, क्रीडा रत्न श्री नितीनजी बलराज आदी उपस्थित होते.