Breaking News
recent

महिला डॉक्टरची अश्लील चित्रफीत तयार करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

 


     मुंबई: रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरची रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याने अश्लील चित्रफीत तयार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या एका रुग्णालयात घडली असून याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली आहे.अशोक गुप्ता (वय २८) असे या आरोपीचे नाव असून तो रुग्णालयात सफाई कर्मचारी आहे.

 रविवारी सकाळी आरोपी सफाईच्या निमित्ताने याच रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरच्या खोलीत गेला होता. त्यावेळी महिला डॉक्टर अंघोळ करत असताना आरोपीने स्वछतागृहाच्या खिडकीतून महिलेचे अश्लील चित्रण करण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Powered by Blogger.