श्रीरामपूरात मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला सुरवात
श्रीरामपूर(प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)-
मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या सकल मराठा समाज बांधवांना श्रीरामपूर शहरात साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली. मराठा समाजाने श्रीरामपूर बंद, कॅन्डल मार्च, महाविराट सभा घेत सरकारवर आरक्षण देण्याबाबत दबाव वाढविला आहे. आरक्षण लढ्याचा अंतिम टप्पा आता सुरू झाला आहे. या लढ्यात जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाज, श्रीरामपूरच्यावतीने करण्यात आले आहे.
उद्यापासून दररोज श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागातील व ग्रामीण भागातील विविध गावांतील मराठा समाज बांधव साखळी उपोषणात सहभाग नोंदविणार असून आज पहिल्या दिवशी नागेश सावंत, बाळासाहेब आगे, संजय गांगड, सुरेश कांगुणे, केतन खोरे, अण्णासाहेब डावखर, शरद मामा नवले, ऋषिकेश मोरगे, योगेश जाधव, राजेंद्र भोसले, संजय बोंबले, एकनाथ डांगे, भगवान धनगे, शशिकांत शिंदे, राजेंद्र बोर्डे, योगेश जाधव, अमोल बोंबले, सुधीर भगत, बाबासाहेबब वाघ, अशोक पिसे, अशोक लबडे, अरूण लबडे, राजेंद्र सलालकर, किरण पवार, मयूर पवार, सचिन उघडे, योगेश गायधने, एकनाथ काळे, बाबाजी ढोकचौळे, संतोष गव्हाणे आदींनी सहभाग नोंदविला.