Breaking News
recent

आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न



शिर्डी (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी):-

 बाभळेश्वर -  मिशन लाइफ - पर्यावरणासाठी जीवनशैली. तारीख – १२ जानेवारी, २०२४ – बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज, स्थित एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी- The Energy and Research Institute) व मारिया भवन बाभळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यदायी जीवनशैली मिशन LiFE – जीवनशैलीसाठी पर्यावरणावर जागरूकता कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम MoEFCC द्वारे अर्थसहाय्यित EIACP योजनेअंतर्गत गेला. मिशन लाइफ हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती पल्लवी सिंग (टेरी), इतर मान्यवर फादर जॉर्ज (संचालक बॉस्को ग्रामीण विकास केंद्र), सिस्टर अनिता ग्रेसिअस (संचालिका मारिया भवन ), फादर अब्राहाम, फार, पंडित होते. 


    कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थना गीताने आणि तेथील अहमदनगरच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या स्वागत नृत्याने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अनिल ब्राम्हणे यांनी केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अगदी सुरुवातीलाच, श्रीमती पल्लवी सिंग यांनी विद्यार्थ्यांना आणि लोकांना TERI च्या मिशन लाइफ उपक्रमाविषयी समजावून सांगितले आणि या भूमातेचे संरक्षण करण्यासाठी सर्वांना त्यांच्या जीवनात छोटे बदल करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पथनाट्य आणि भारुड (सांस्कृतिक कला नृत्य) पर्यावरण, शाश्वत शेती च्या माध्यमातून भूमातेला वाचवण्यासाठी चांगले नागरिक म्हणून आपली भूमिका बजावण्यासाठी आव्हान केले. त्याचे सर्वांनी चांगलेच कौतुक केले.

     फादर जॉर्ज (संचालक बॉस्को ग्रामीण विकास केंद्र) यांनी पर्यावरणाचे रक्षण, रासायनिक खतांचे शेतीवर होणारे दुष्परिणाम, आपल्या दैनंदिन जीवनातील प्लास्टिक कमी करणे आणि सकस आहार या विषयावर विद्यार्थी आणि लोकांशी संवाद साधला. त्यानंतर श्री विलास आल्हाट आणि अर्जुन शरणागते यांनी वातावरण बदल आणि आपली भूमिका ह्यावर सर्वाना मार्गदर्शन केले.  सौ. मंगल मकासरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता सौ.मंगल मकासरे यांनी आभार मानून केली.

Powered by Blogger.