राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
ओझर टाऊनशीप (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी ) :
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतिने ओझर टाऊनशीप एच.ए.एल हायस्कूल येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा संपन्न होवुन उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व आदर्श शिक्षकांचा सत्कार समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी शालेय हाॅलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मादकद्रव्य व गुटखा विडी सिगारेट व तंबाखूजन्य अमंली पदार्थाच्या प्रतिकृतीची होळी करण्यात आली.
यावेळी विचारपिठावर रविंद्रदादा जाधव मुख्याध्यापक आर.एल. पगारे , पर्यवेक्षक एस.ए. ब्राम्हणे, राज्य सचिव प्रशांतजी ढेंगळे, राज्य उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, उत्तर महाराष्ट्र संघटक राजनंदीनी आहीरे, जिल्हा उपाध्यक्ष शशीभाऊ जाधव, जिल्हा नेते उत्तमराव जाधव, तालुकाध्यक्ष आशाताई जाधव, शिलाताई जाधव, सोमनाथ गांगुर्डे, फरजाना शेख, वनिताताई जाधव, वर्षाताई बोरसे, शहराध्यक्ष असलम शेख, पत्रकार जुबेर शेख, मायाताई मोहीते आदी. पदाधीकारी उपस्थित होते. यावेळी प्रशांतजी ढेंगळे व सौ.राजनंदीनी आहीरे यांनी व्यसनमुक्तीवर प्रबोधनात्मक मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात रविंद्रदादा जाधव म्हणाले की व्यसनाचे अनेक दुष्परिणाम समाजात बघायला मिळतात, व्यसनामुळे विद्यार्थी व युवकांची तेजस्विता नष्ट होत आहे. तप्तरता संथ होत आहे व तपस्विता भंग होत आहे. युवकास व विद्यार्थ्यांस व्यसन लावुन न घेणे हाच समितीचा मुळ उद्देश असुन व्यसनामुळे अनेक रोगांना बळी पडावे लागत असुन एखाद्या परिक्षेत यश मिळाले तर हुरळुन जावु नये तर अपयश आले तर निराश होवु नये हे जीवनसुत्र मनात रुजवणे गरजेचे असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन, समुपदेशन, चांगले छंद व सुसंगत यासारखे उपक्रम राबवावे व पालक, पाल्य, शिक्षक यांचा सुसंवाद उपक्रम राबवल्यास विद्यार्थी व्यसनापासून दुर राहील असे प्रतिपादन रविंद्रदादा जाधव यांनी केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देवुन मुख्याध्यापक आर. एल. पगारे यांनी सत्कार केला. तर अन्याय अत्याचार निर्मूलन समिती तर्फे दहा वकृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांस बक्षीस म्हणून स्कुलबॅग व शालेय साहित्य प्रमाणपत्र देण्यात आले. तर स्पर्धेत भाग घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांस वह्या देण्यात आल्या. तसेच युवादिना निमित्त "आदर्श शिक्षक पुरस्काराने" मुख्याध्यापक आर एल पगारे, प्राचार्य आर.एम.चौधरी, उपप्राचार्य सुरेंद्र पगारे, पर्यवेक्षक एस.ए.ब्राह्मणे, प्रा.प्रभात सोनवणे, एस.एन.जोशी,सौ. एन जी गोरे, सौ.एम.टी.गुंजाळ, एस.एम.भोई, सौ.एम.ई.वाकचौरे, बाळासाहेब पवार, बि.के.साबळे इत्यादी शिक्षकांचा फेटा शाल सन्मानपत्र गुलाबपुष्प देवुन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचा राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. सुत्रासंचालन शिक्षीका निलिमा मोंढे यांनी केले तर आभार सुरेश जोशी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमास असंख्य विद्यार्थ्यी पालक शिक्षक व पदाधिकारी होते.