मौलाना आझाद कॅम्पस नांदुरा येथे शिक्षक पालक सभेचे आयोजन
दिनांक 22.01.2024 नांदुरा:- मौलाना आझाद-उर्दू प्राथमिक, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि माजिदिया उर्दू हायस्कूल नांदुरा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनासाठी मौलाना आझाद कॅम्पस नांदुरा येथे शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड अब्दुल रफिक होते. या सभेचे उद्घाटन मलकापूर विधानसभेचे आमदार मा. राजेशजी एकडे यांच्या हस्ते करण्यात आले. नांदेड येथून आलेले सैय्यद मोईजुर्रहमान साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सचिव मोहम्मद तौसिफ, माजी न.प. उपाध्यक्ष लालाभाऊ इंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी भगवान सोयस्कर, नवनिर्वाचित सहकारी बँकेचे सदस्य राम ढोरे, अफजल हुसेन, अधिवक्ता झेड बी शेख, जनता टेंट हाऊस चे शेख इक्रामोदीन व अब्दुल गफूर उपस्थित होते.
आमदार राजेश एकडे यांनी आपल्या भाषणात शिक्षण घेण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला तर संस्थेचे अध्यक्ष ॲड.अब्दुल रफिक यांनी आपल्या भाषणात शाळेच्या उपलब्धिंची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. तसेच संस्थेच्या भविष्यातील योजनांबाबत पालकांना आश्वासन दिले.
प्रमुख मार्गदर्शक सैय्यद मोईजुर्रहमान साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पालकांना आवाहन केले की मुलांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. मुलींना उच्च शिक्षण द्यावे. मुलांच्या शिक्षणाची काळजी कशी घ्यायची हे त्यांनी खूप छान समजावून सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार राजेशजी एकाडे, सैय्यद मोईजुर्रहमान साहेब, तस्मिया फाऊंडेशन, शेख इक्रामोदीन यांना संस्थेतर्फे विशेष सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच सर्व शाळांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ॲड अब्दुल रफिक व सचिव मोहम्मद तौसिफ यांचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे प्रमाणपत्र देण्यात आले. या सभेला 800 हून अधिक स्त्री-पुरुष पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जळगाव खान्देश येथील प्रसिद्ध कवी साबीर मुस्तफाबादी यांनी केले. त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात येऊन सन्मानचिन्ह देण्यात आले. आभार प्रदर्शन जिकरुल्ला खान सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.