निमगांव येथे भजनसंध्या, राम का गुणगान करीए
प्रतिनिधी नांदुरा प्रशांत पाटील
नांदुरा...अयोध्या येथे श्री रामललांच्या मुर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त संपुर्ण हिंदुस्थानात महाउत्सव साजरा करण्यात आला तर निमगाव येथे सुध्दा संध्याकाळी राम का गुण गान करीए या राम भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
निमगांव येथे रामदल मंडळांच्या वतीने श्री शिवाजी महाराज चौकात दि.22 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या कार्य्रक्रमात अकोला येथील सुप्रसिध्द गायक पदमाकर मोरे यांनी आपल्या मधुर आवाजात भक्ती गीते सादर केली आरंभी वंदीतो अयोध्येचा राजा या गिताने कार्यक्रमाची सुरवात झाली तर अनेक भावगीत व भक्तीगीतांचा आनंद यावेळी उपस्थीत श्रोत्यांनी घेतला या वेळी पदमाकर मोरे यांना हार्मोनियमवर अविनाश कुळकर्णी यांनी तर तबल्यावर प्रसिध्द तबलावादक राजेंद्र सावळे यांनी साथ केली विक्की चोपडे यांनी मंजीरीसाथ केलीं कार्यक्रमाला निवेदक म्हणुन महेश पांडे हे होते कार्यक्रमाच्या यशष्वीतेसाठी रामदल मंडळाचे सदस्य तसेच प्रदिप गावंडे .अमोल पहुरकर,संदीप सातव,मोहन कुळकर्णी यांनी परीश्रम घेतले कार्यक्रमाला गावातील रसीक स्त्री पुरूष उपस्थीत होते