मराठा आरक्षणा संदर्भात सर्व मागण्या मान्य
प्रतिनिधी नांदुरा प्रशांत पाटील
संघर्ष योद्द्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या लढ्याला अभूतपूर्व यश..नांदुरा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष..
कित्येक वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरू होता.कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती, अखेर आज मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला केलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या सरकारने मान्य आहेत.त्याचा सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे,नांदुरा शहरात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत विजय उत्सव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांना हारार्पण करून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' ' जय जिजाऊ जय शिवराय 'जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत सर्वांनी एकमेकाला पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला .