अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरू
प्रतिनिधी नांदुरा प्रशांत पाटील
पोलीस स्टेशन नांदुरा येथे ठाणेदार श्री विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरू असून दिनांक 26/01/2024 व दिनांक 27/01/2024रोजी करण्यात आलेल्या कारवाईबाबत ची माहिती खालील प्रमाणे.
बेलाड ता नांदुरा
दिनांक 26/01/2024 रोजी पो स्टे चे स फौं राजपूत,पोहेका मिलिंद जंजाळ, यांनी ग्राम बेलाड यात्रा पेट्रोलिंग दरम्यान पूर्णा नदी काठी आरोपी नामे - सोपान नारायण खिरडकर वय 42 वर्षे रा. वार्ड क्र-06 कु-हा काकोडा ता मु. नगर जि. जळगाव खा हा तीतली भवरा नावाचा जुगार पैश्याचे हारजितवर खेळताना व खेळवितांना मिळुण आला असता त्याचे अंगझडतीतुन 01. तितली भवरा जुगाराचे नगदी 1950/- रु 02. डावावर नगदी 630/- रूपये 03. एक तितली भवरा बोर्ड की 00/- असो एकूण 2580/- रू चा तितली भवरा जुगार मुददेमाल मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदुर बिस्वा
त्याचप्रमाणे दी 26/01/2024 रोजी ग्राम चांदूर बिस्वा येथे आठवडी बाजार येथे सार्वजनिक ठिकाणी चांदुर् बीस्वा बीटचे अंमलदार पोहेका खोंदिल, पोकां तडवी,यांना आरोपी नामे श्रीकृष्ण नामदेव उंबकर वय ६२ वर्ष चंदुरबिस्वा नांदुरा याच्या ताब्यात देशी दारु टॅगो पंच 90 एमएल 20 नग सिंलबंद शिशा प्रत्येकि 40 रु प्रसाणे 800 रुपये 2. एक वायरची थैली किं 10 रुपये असा एकुण 810 रु. चा. प्रोव्ही माल मिळून आल्याने गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
वडनेर भोलजी
त्याचप्रमाणे आज दिनांक 27/01/2024 रोजी ग्राम वडनेर भोलजी येथे वडनेर भोलजी ओपी येथील सपोनी जायले साहेब,पोका वेरुळकर , पोकां धामोलकर यांना यातील आरोपी नामे सागर प्रतापसिंह देशमुख वय 33वर्ष राहणार वडनेर भोलजी याच्या ताब्यात देशी व विदेशी दारू चा 1720/- रुपयाचा प्रोव्ही माल मिळून आल्याने गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.