प्रधानमंत्री विश्वक्रमा योजनेअंतर्गत मार्गदर्शन व बारा बलुतेदारांचा मेळाव्याला प्रतिसाद
पारंपारिक कारागिरांचे मनोबल वाढवण्यासाठी योजना - आ डाॅक्टर संजय कुटे
पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी पंप्रधान विश्वकर्मा योजनची निर्मिती करण्यात आली आहे,याचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन माजीमंत्री तथा आ.डॉ संजय कुटे यांनी केले.
जळगाव जामोद येथे आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मार्गदशन व बारा बलुतेदार बांधवांच्या भव्य मेळावायचे आयोजन काल २८ जानेवारी रोजी श्री कॉटेक्स सूनगाव रोड जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते।
यावेळी उपस्थित बांधवांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यात आली।
यानिमित्ताने पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, मुद्रा योजना, स्वच्छ भारत योजना, उज्ज्वला योजना, जल ही जीवन अभियान या योजनेतून जनतेला झालेला फायदा यावरही डाॅ संजय कुटे यांनी भाष्य केले.
प्रास्ताविकात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना समिती जिल्हा सदस्य रविंद्र ढोकणे यांनी या योजनेची माहिती दिली.प्रारंभी विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
यावेळी पिएम विश्वकर्मा योजना समितीचे जिल्हा संयोजक श्रीकांत आव्हेकर,यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन चंद्रकांत शिंदे तर् आभार अनिल उंबरकर यांनी केले।।