अकोट - खंडवा रेल्वे मार्गावर होणार सहा नविन रेल्वे स्टेशनची निर्मिती
भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाला मिळणार गती...
अकोला-इंदोर ब्रॉडगेज कन्वर्जन मधील अकोट-हिवरखेड-आमला खुर्द सेक्शन मधील नवीन वळण मार्गावरून होणाऱ्या अडगाव-हिवरखेड- सोनाळा, टुनकी,जामोद, कुवरदेव तुकईथड आमला, खंडवा या नवीन रेल्वे मार्गासाठी संग्रामपूर व जळगांव जामोद तालुक्यातील अनेक गावांमधील भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाला वेग मिळणार आहे...
प्रवाशी व व्यापारी यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अकोट हिवरखेड- टूनकी , खंडवा हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्याची रेल्वे प्रवाशी वाट पाहत आहेत. हा नवीन रेल्वे मार्ग अकोला जिल्ह्यातील अकोट व बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद उपविभागातून जाणार असून यासाठी रेल्वे विभागाला विविध गावांच्या शिवारामधून भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे प्राप्त परिस्थितीत दिसुन येत आहे,
या रेल्वे मार्गावर अकोट, अडगांव, नंतर. हिवरखेड, सोनाळा, जामोद, उसरणी, खकणार, खिडकी, अशी सहा नविन रेल्वे स्टेशन तयार होणार आहेत,
तब्बल सात वर्षां पूर्वी अकोला अकोट मार्गे खंडवा अशी नॅरोगेज मार्गावर रेल्वेने प्रवाशी तसेच माल वाहतूक सूरू होती परंतु ब्रॉडगेज मार्ग तयार करण्यासाठी 2016 पासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे ..आर्थिक तरतुदी मुळे सदर काम रेंगाळत पडले होते तर कालांतराने व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधून हा मार्ग असल्याने पर्यावरण प्रेमींनी या मार्गावर आक्षेप घेत विरोध दर्शविला होता, वन्य प्राण्यांचें हित लक्षात घेता, या रेल्वे मार्गात बदल करून नवीन मार्गासाठी गत वर्षा पासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने भूसंपादन प्रक्रिया हाती घेण्यात आली असून सदर काम गतीने सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे....