हिंदी मराठी पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी अनिल तुपे.
श्रीगोंदा शहर प्रतिनिधी -हिंदी मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी श्रीगोंद्यातील निर्भीड पत्रकार अनिल तुपे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्ती केली. 26 जानेवारी 2024 या दिवशी श्रीगोंद्यातील सर्व स्तरातील पत्रकार बाांधवांना विचारात घेऊन चर्चा करुन पुढील कार्यकारणी जाहीर करणार आहेत. हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्रा सह संपुर्ण भारत भर काम करते.
आंतरराष्ट्रीय मानांकन ISO-9001-2015 प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार संघ ही संघटना थोर महापुरूषाच्या विचारांवर चालणारी संघटना आहे, अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन हिंदी मराठी पत्रकार संघ काम करते, दैनिक, साप्ताहिक, सायंदैनिकं ,(प्रिंट मीडिया), टीव्ही चॅनल, यूट्यूब न्यूज चॅनल, न्यूज पोर्टल व इतर सर्व माध्यमातील संपादक, पत्रकार, निवेदक, प्रेस फॉटोग्राफर, प्रेस कर्मचारी, पेपर वितरक, यांच्या समस्या व अन्याय आत्याच्याराच्या विरोधी आवाज उठवणे, शेतकरी, कामगार, महिलांचे प्रश्न, आरोग्य शिक्षण, स्वयंरोजगार व विविध योजनांच्या विषयी मार्गदर्शन, महिला सबलिकरण, दिव्यागांना मदत करणे, शासनाच्या विविध योजना गोरगरिबापर्यत पोचवणे, असे विविध विषय घेऊन संघटनेची पुढील वाटचाल सुरू आहे.
या संघटनेत सामील होण्यासाठी तालुकाध्यक्ष श्री अनिल तुपे यांच्या शी संपर्क साधावा. या निवडी बद्दल पी. आय. भोसले साहेब. तहसीलदार ढोकले साहेब, तहसील दार कुलते साहेब, लहुजी सेनेचे संतोष शिंदे, बापू गायकवाड, संग्राम पवार, अनघा मॅडम, नाना कोथिम्बिरे, आप्पा, सोनवणे, पत्रकार शकील भाई शेख, , महिलांना च्या ग्रुप मधील सर्व महिला, सामाजिक कार्यकर्ते, मित्र मंडळ, तसेच हिंदी मराठी संघातील सर्व सभासद, विशेष म्हणजे संघटना करण्यासाठी पाठबळ दिले असे, पत्रकार,शिवाजी साळूंखे, (सार्वमत ), योगेश चंदन (पुण्य नगरी )समिरण नागवडे (प्रभात )राजू शैख (सिटीजन ), चंदन घोडके, (बहुजन समता पत्र ) यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडी साठी शफिक हवालदार, अमर घोडके, समीर मचे,झिटे, गावडे, लोखंडे, सचिन शिंदे लोखंडे सर, यवले, श्रीगोंदा. शहर प्रतिनिधी बनसोडे, यांनी एक मताने निवड केली.