Breaking News
recent

विहिरीत पडलेल्या हरिणास ओम साई फाउंडेशन कडून जीवनदान

 प्रतिनिधी नांदुरा प्रशांत पाटील

     शहरातील रेल्वेलाईन अलमपुर शेतशिवारात  गजानन देशमुख यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत हरीण पडल्याची माहिती विजय होणाळे यांनी शहरातील सेवाभावी संस्था ओम साई फाउंडेशनला दिली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ओम साई फाउंडेशनने फॉरेस्ट अधिकारी राजेश शिरसाट  यांच्याशी संपर्क साधून माहीती दिलेली होती.

     दरम्यान  ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास  निंबोळकर व सदस्य अजय गवई, अश्विन फेरण, वैभव राहणे, समीर खान, शुभम होणाळे, आझाद डाबेराव, राहुल इंगळे, अनंत नवथळे व इतर घटनास्थळी दाखल झाले व रेस्क्यू ऑपरेशन करून विहिरीत पडलेल्या हरिणास बाहेर काढले व त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Powered by Blogger.