मुलामुलींच्या शैक्षणिक सुविधेसाठी निवासी आश्रमशाळा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :- (वाशिम)
मानोरा तालुक्यातील दापुरा,फुलउमरी, इंगलवाडी,शेंदोणा,वाईगौळ यासह जिल्ह्यात 26 ठिकाणी इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण विभागाद्वारे शतप्रतिशत अनुदान तत्वावर मागील काही वर्षांपासून प्राथमिक/माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा सुरू आहे.यासर्व आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधेकरीता इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने मुख्याध्यापक व वसतिगृह अधीक्षकांना लेखी कळविले आहे.
इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या वतीने वेळोवेळी वसतिगृहाची तपासणी करून सूचना देण्यात येतात.मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील तपस्वी काशिनाथ बाबा संस्थेच्या आश्रमशाळेने विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना त्रूटीमागे 5 हजार रुपये याप्रमाणे 25 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती इतर बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मारोती वाठ यांनी दिली.