कोठारी शाळेच्या तीन शिक्षकांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन
प्रतिनिधी नांदुरा प्रशांत पाटील .
नाशिक येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र मास्टर्स अथलेटिक्स असोसिएशन द्वारे आयोजित महाराष्ट्र मास्टर अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नांदुरा येथील सायकल ग्रुपचे सदस्य असलेल्या कोठारी शाळेच्या तीन शिक्षकांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यामध्ये कोठारी प्राथमिक शाळा, नांदुरा येथील शिक्षक फाटे सर यांनी हातोडा फेक व शंभर मीटर धावण्यामध्ये दोन्हीकडे गोल्ड मेडल जिंकले तर भालाफेक मध्ये कांस्यपदक पदक जिंकले. दराडे सर यांनी लांब उडी व १००मीटर धावणे या दोन्हीमध्ये रजत पदक जिंकले, व पिवळदकर सर यांनी१0 कि.मी. धावणे या प्रकारात गोल्ड मेडल मिळवून दणदणीत बाजी मारली.
विशेष हे तिन्ही शिक्षक उत्कृष्ट सायकलपटू म्हणून नांदुरा सायकल मित्र ग्रुपचे सदस्य आहेत. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या या स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय झालेल्या या स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल नांदुरा सायकल मित्र ग्रुप कडून स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना पुढे होणाऱ्या अनेक स्पर्धेत असेच घवघवीत यश मिळावे, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या तिन्ही स्पर्धकांनी राज्यस्तरावर यश संपादन केल्यामुळे त्यांची पुणे येथील बालेवाडी या ठिकाणच्या होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे