Breaking News
recent

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

 




श्रीरामपूर( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) :-

 मराठी भाषिक वृत्तपत्राचे जनक दर्पण कार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ  दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी  महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात दुपारी १=०० वाजता पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला पत्रकार बंधू आणि भगिनीं कडुन उत्स्फूर्त असा प्रतिसाद पुष्पहासदर कार्यक्रमावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात आली असून यावेळी ज्येष्ठ संपादक व पत्रकार यांचे नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच फेब्रुवारी 2024 मध्ये पत्रकार संघाच्या वतीने राज्यव्यापी स्नेह मेळाव्याचे आयोजन करणे बाबत तारीख व नियोजनाबाबत चर्चा व निर्णय घेण्यात आला आहे.तसेच पत्रकार संघात मागिल अनेक वर्षांपासून एक निष्ठेने काम करत असलेल्या आणि नविन पदाधिकारी यांच्या महाराष्ट्र राज्य विविध जिल्हा तालुका शहर पदांची निवड करत नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देखील देण्यात आले आहे महाराष्ट्र लघु वृत्त व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, यांनी पत्रकार बंधू आणि महीला भगिनींना  वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारधारानुसर ६ जानेवारी १९३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो. अर्थातच १९३२ चा काळ इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता आणि या काळात समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळशास्त्रींना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘दर्पण’ या पाक्षिकाची सुरूवात मुंबई येथे करुन मराठी वृत्तपत्र इतिहासाची ज्योत पेटविली. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: बाळशास्त्री इंग्रजी मजकुराची बाजू 'दर्पण' साठी सांभाळत. त्यामुळे 'दर्पण' तील मजकुराचा दर्जा उच्च स्वरुपाचा होता आणि आपले पत्रकार देखील याची जाणीव ठेवतिल आपल्या पत्रकारीतेत दर्पण सारखा मजकुराचा दर्जा टिकवून धरतील असे.उपस्तिथ पत्रकारांना मार्गदर्शन करत पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी केले त्यावेळी ते बोलत होते की सत्य सगळ्यांनाच आवडतं ते लिहिण्याची धमक पण आम्ही दाखवतो. पण जेव्हा ते सत्य स्वीकारण्याची वेळ समाजाचा घटक म्हणून ज्याच्या विषयी लिहिली त्याच्यावर येते तेव्हा मात्र लिहिणारा पत्रकार हा धोकेदायक वाटतो. ही आजच्या पत्रकारितेची शोकांतिका आहे तरी देखील आम्ही पत्रकार म्हणून समाजाचा आरसा सत्य परिस्थिती मांडत राहणार ज्यांना पटलं त्यांनी घ्यावे ज्यांना नाही पटलं त्यांनी सोडून द्यावं लेखणी हीच आमची ताकद आहे तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कासम भाई शेख यांनी केले. यावेळी महाराष्ट्र लघु वृत्त पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बी. के. सौदागर, कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज मोहम्मद के. शेख, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, उस्मान भाई के शेख, सुखदेव बाबा केदारे, अकील हाजी सुना भाई, मोहम्मद हनीफ तांबोळी, राहुल कोळगे, रवींद्र जगताप, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण, श्रीरामपूर शहर सचिव इम्रान सरदार शेख, एजाज सय्यद, ऋषी पोळ, राजेंद्र सूर्यवंशी, मुसा भाई सय्यद, मोहम्मद अली सय्यद, कासम भाई शेख, मोहम्मद गौरी, अनिस भाई शेख, शब्बीर कुरेशी न्यूज एन एम पी चे कार्यकारी संपादक शौकत पठाण ,बानोबी शेख ,सविताताई भालेराव ,आरतीताई सोनवणे, विजया ताई बारसे ,वंदनाताई गायकवाड आदीं मांन्यवर पदाधिकारी उपस्थित होते


Powered by Blogger.