Breaking News
recent

गणेश गोतमारे यांची भाजपा ओबीसी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

    जळगांव जामोद मतदार संघातील सोनाळा निवासी असलेले भाजपा चे सक्रिय कार्यकर्ते गणेश गोतमारे यांची नुकतीच भाजपा ओबीसी आघाडी चे खामगांव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे ही निवड भाजपा चे नेते माजी मंत्री जळगांव जा.मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ.संजय कुटे,भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,प्रदेश उपाध्यक्ष मा.आ. चैनसुख संचेती,आमदार आकाश फुंडकर भाजपा ओबीसी आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुरेश गव्हाळ यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.गणेश गोतमारे हे भाजपा चे कामात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहेत.या पूर्वी त्याचे कडे भाजपा तालुका चिटणीस व शहर मंडला च्या विविध जबाबदाऱ्या होत्या.सोनाळा येथील विविध कार्यकारी सोसायटी चे सुध्दा माजी अध्यक्ष ते होते.

    आदिवासी भागात सुध्दा विविध उपक्रम राबवून अनेक लोक त्यांनी पक्ष कार्याशी जोडले.सामाजिक दृष्टिकोनातून ओबीसी संदर्भात त्यांची सामाजोउपयोगी कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांचे कडे ओबीसी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष पद देऊन नियुक्ती केली आहे त्यांचे नियुक्ती मुळे पक्ष अजून भक्कम झाला आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे या निवडी ने कार्यकर्त्यात उत्साह व चैतन्य निर्माण झाले आहे.पक्षाचा जो आदेश असेल त्या नुसार काम करून जिल्ह्यामध्ये पक्षकार्य भक्कम करू तसेच पक्ष सर्वव्यापी व सर्वस्पर्शी करू असे प्रतिनिधी शी बोलताना गणेश गोतमारे म्हणाले.यावेळी संग्रामपूर तालुका भाजपा ओबीसी आघाडी चे तालुका अध्यक्ष पदी संजय शिंगणापूरे, खामगांव जिल्हा सचिव पदी रामदास म्हसाळ,संजय कौलकार जिल्हा सदस्य पदी रवी लव्हाळे आदींची निवड झाली आहे.या निवडीने कार्यकर्त्यात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Powered by Blogger.